यावल एसटी आगारात लालपरीचा ७६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज आपल्या सर्वांची आवडती लालपरी एसटी बस ही ७६ वर्षाची झाली असून या निमित्ताने यावल आगारात एसटी महामंडळाच्या वतीने वर्धापन विविध उपक्रमांनी उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्यात १ जुन१९४८ रोजी बी एस आर टी सी ची (बाँबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोरॅशन) पहिली बस ही पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली होती. ग्रामीण असो किंवा शहरी असो या सर्वसामान्यांचे दळणवळणाचे प्रमुख साधन म्हणुन एसटी बसची ओळख निर्माण झाली आहे

यावल येथील बसस्थानकावर १ जुन रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर या प्रामुख्याने उपस्थित होत्या, सदर कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदारांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप भास्कर महाजन यांच्यासह आगाराचे वाहतूक निरीक्षक एस एम सोनवणे, बी के तडवी, डी एन ठाकरे यांनी गुलाबपुष्प, साखर पेढे देवुन प्रवाशांचे स्वागत सत्कार केले. यावेळी सुन्दर अशा कार्यक्रमास आगारातील चालक वाहक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण आगारातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content