Home Cities जळगाव वंचितचे ललित घोगले यांचा प्रचाराचा झंझावात; पिंप्राळा हुडकोत जोरदार प्रचार रॅली

वंचितचे ललित घोगले यांचा प्रचाराचा झंझावात; पिंप्राळा हुडकोत जोरदार प्रचार रॅली


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर विधानसभ मतदार संघासाठी वंचीत बहुजन आघाडीचे उमदेवार ललित घोगले यांची आज पिंप्राळा हुडको येथे प्रचार रॅली काढण्यात आली होती.

यावेळी असंख्य महिला भगिनी आणि पदाधिकारी या रॅलीत सामील झाले होते. यावेळी ठीकठिकाणी ललित घोगले यांचे स्वागत करण्यात येऊन महिलांनी औक्षण करीत त्यांना आशीर्वाद दिले.अबकी बार ललित भाऊ आमदार, ललित भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो अश्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, हभप राष्ट्रीय समाज प्रबोधनकार माईसाहेबराजे पाटील, डीगंबर सोनवणे, राहुल सुरवाडे, सुजाता ठाकूर, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound