जळगाव (प्रतिनिधी) शहरात आज दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास तांबापुरा भागातील खदानीजवळ गवळीवाड्यात चाऱ्याच्या गंजीला आग लागून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. महापालिकेच्या एका बम्बाने ही आग आटोक्यात आणली.
अधिक माहिती अशी की, गुरेपालनाच व्यवसाय असलेल्या कैलास उत्तम हटकर यांच्या मालकीच्या चार्याच्या गंजीला अचानकपणे आग लागली, ही आग आसपास पडलेल्या कचर्याला लागलेल्या आगीमुळे चार्यापर्यंत पोहोचल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. कचर्याला मात्र आग कशामुळे लागली त्याचे कारण कळू शकले नाही. या आगीत सुमारे एक लाख रुपये किमतीचा चारा जळाल्याचे हटकर यांनी सांगितले. मनपाच्या एका बम्बाने ही आग आटोक्यात आणली. हटकर यांच्याकडे १५ म्हशींसह २६ गुरे आहेत, सुदैवाने यात जीवितहानी मात्र झाली नाही.
पहा– या आगीचा व्हिडीओ.