मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईच्या माहीम पश्चिम येथे ५ मे रोजी संध्याकाळी एका निवासी इमारतीचा स्लॅब कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला. तर, एक जण जखमी झाला. जखमीला हिंदुजा रुग्णालयात पाठवले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बे स्कॉटिश शाळेजवळील दिलीप गुप्ते मार्गावरील एका मजली रिकाम्या इमारतीचा पहिल्या मजल्याचा मोठा स्लॅब कोसळला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही ढिगाऱ्यातून बाहेर काढून त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. मात्र, यातील एकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृताचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. चंद्रिका यादव (वय, ३२) असे जखमी झालेल्या महिलेची नाव आहे. चंद्रिका देखील मजूर आहे. सुरुवातीला तिला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण नंतर तिने स्वत:ला सायन रुग्णालयात हलवले.