चोपडा, प्रतिनिधी | येथे लालबावटा शेतमजूर यूनियनतर्फे चोपडा बस स्टॅन्ड समोरील आयटक कार्यालयापासून तहसिलदार कार्यालयावर शेतमजूर.. बांधकाम मजूर गरजू प्लॉटधारकांचा मोर्चा प्रचंड काढण्यात आला.
मोर्चाचे नेतृत्व भारतीय खेतमजदूर युनियनचे राष्ट्रीय कमेटी सभासद कॉ. अमृत महाजन, यूनियनचे जिल्हा सचिव कॉ. गोरख वानखेडे, खजीनदार निंबाजी बोरसे, किसानसभा हातेडचे अध्यक्ष सूनिल बाविस्कर, सूनिल बोहरा आदींनी केले.या मोर्चात उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे १० शेतमजूरांची हत्या करण्यात आली त्याचा व जम्मू आणि काश्मीर मध्ये जनतेचे मत विचारात न घेता ३७० व ३५ अ कलम रद्द करण्यात आले याचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. मोर्चेकऱ्यांनी नायब तहसिलदार पंजे यांना या निषेधासह शेतमजूरांच्या सविस्तर १४ मागण्यांचे निवेदन दिले. यात शेतमजूर आदीवासी बांधकाम मजूरांचे प्रश्न सोडवा आणि नविन विज मीटर ग्राहकांची लूट थांबवा. डीबीटी योजना बंद करा. शेवरे बू आदीवासीना मारहाण करणाऱ्या वन कर्मचारीवर कारवाई करा, वनाधिकार कायदा पेसा कायद्याची अंमलबजावणी करावी, वढोदा , अजंतीसीम भिल्ल आदीवासीना घरकूले द्या, मोहिदा भिलाटीत रस्ता ,दिवाबत्ती, गटार, सपाटीकरण ,घरकूले बांधकाम आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात आदी मानण्या करण्यात आल्यात. तसेच हातेड खूर्द व काजीपूरा येथील गरजू बेघरांना प्लाटचे ताबे द्या. ताबे न दिल्यास येत्या १२ सप्टेंबर रोजी बेमूदत उपोषणाचा इशारा देण्यात आला. याप्रसंगी शेतमजूर यूनियनचे १४ गावातील प्रमूख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. त्यात काजीपूरा सरपंच रविंद्र पवार, कॉ. वासूदेव कोळी, जिजाबाई राजपूत, राजेंद्र पाटील, रतिलाल भिल, मंगल भिल, अरमान तडवी, एकनाथ वाणी, रघूनाथ बाविस्कर, दौलत वाघ, ठगूबाई कूंभार, चमेलाबाई शिंदे, सूनिल कोळी, भूषण कोळी, शिवाजी पाटील ,किशोर सोनवणे, बाबूलाल वाणी, अरिफखान, प्रल्हाद मोरे,
प्रेमचंद पारधी आदींचा समावेश होता.