Home धर्म-समाज कामगार दिनानिमित्त वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या विद्यूत सहाय्यकाचा सत्कार

कामगार दिनानिमित्त वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या विद्यूत सहाय्यकाचा सत्कार

0
32

WhatsApp Image 2019 05 03 at 3.22.35 PM

बोदवड (प्रतिनिधी ) कामगार दिन तालुक्यात विविध ठिकाणि साजरा करण्यात आला. यात बोदवड तहसिलदार कार्यालयात तहसिलदार रविद्र जोगी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर काही ठिकाणी कामगारांचा सत्कार करण्यात आला.

 

महाराष्ट राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे तालुक्यतील सर्व विद्युत सहाय्यक कर्मचारी यांचा कामगार दिनानिमित्त महराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे उप कार्यकारी अभियंता बोदवड दिपक राठोड यानी सन्मान पत्र देवुन सत्कार केला. विद्युत सहाय्यक यांनी १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान उप विभाग मुक्ताईनगर अतंर्गत वसुलिचे ऊद्दीष्ट पुर्ण करुनबोदवड उपविभाग बोदवड अतंर्गत ९६०.१३ लक्ष्य डिमाडं पैकी तब्बल ९११.९० लक्ष्य इतकी विक्रमी वसुली करुन आपले कर्तव्य चोख बजावले. बोदवड तालुका दुष्काळग्रस्त असतांना सुध्दा जनतेने या तालुक्याने विद्युत महावितरण कंपनीला उदीष्ट पूर्ण करण्यास सहकार्य केले. यासाठी सर्वअधिकारी कर्मचारी जनसेवक याचे अभिनंदन करण्यात आले. भविष्यात असेच सहकार्य कपंनीला लाभावे व बोदवड उपविभागिय महावितरण उच्च शिखरावर जाईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound