कुरंगी ता. पाचोरा । नुकतेच एक दिवस आगोदर आलेल्या गिरणा नदीच्या पाण्यात अवैध वाळू उपसामुळे वाळूच्या खड्यात पडून एका बैलाचा मुत्यू झाला. तर दुसरा बैल व शेतकऱ्याला वाचविण्यात यश आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गिरणा परिसरातील गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा धरणातून २००० क्युसेंक्स पाणी सोडण्यात आले आहे. आज रोजी कुरंगी येथून सकाळी नदीला पाणी आल्याने कुरंगी जवळच असलेल्या आसनखेडा येथील शेतकरी अशोक चिंधू पाटील हे आपल्या मालकीची खिल्लारी बैल जोडी बैल गाडे जुपून सांयकाळी ५ वाजता कुरंगी राणीच्या भिंती जवळ गिरणा नदीच्या पात्रात बैल धुत असताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने बैलगाडी वाळूच्या खड्ड्यात पडली. त्यात वाळूत बैलगाडीचे चाक रूतल्याने बैलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर. ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिवसा अवैध वाळू उपसा सुरू राहतो. त्यामुळे त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. शेतकरी अशोक पाटील यांनी नुकतीच ८० हजार किमतीची खिल्लारी बैल जोडी शेती मशागत करण्यासाठी बैलबाजारातून आणली होती. ऐण दुष्काळात शेतकऱ्याचे ४० हजाराचे नुकसान झाले आहे.