एरंडोल प्रतिनिधी । येथील शिवसेनेचे नगरसेवक कुणाल महाजन यांच्या आज 28 वा वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, यावेळी बस स्टँड परिसरात वृक्ष लागवड करण्यात आले. महाजन यांनी लावलेल्या वृक्षांची देखरेख करण्याचे काम व जगविण्याची जबाबदारी माझी राहिल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. या कार्यक्रमात वाकळे सेनेचे तालुकाध्यक्ष वासुदेव पाटील, शहराध्यक्ष अतुल महाजन यांच्यासह शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.