चुंचाळे येथे कुलस्वामिनी कानबाईला भक्तीमय वातावरणात देण्यात आला निरोप

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील चुंचाळे येथे कुलस्वामिनी कानबाई मातेचा उत्सव सालाबादा प्रमाणे मोठ्या भक्तीमय व उत्साहाने साजरा करण्यात आला. भजन-भारुडे म्हणून भक्तीमय वातावरणात गावातील महिला व ग्रामस्थाच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले. याबाबत चुंचाळ्यात ११ ऑगस्ट रविवार रोजी मोठ्या भक्तीमय वातावरणात भक्तीभावाने कुलस्वामीनी कानबाईची विधीवत स्थापना करण्यात आली.

कुलस्वामिनी काही ठिकाणी नारळाला कानबाई स्थापनेच्या एक वस्त्र परिधान करुन कानबाई दिवस अगोदर चौरगांला ची उभारणी स्थापना केली बाबुच्या काडी लावून वस्त्र होती त्याच दिवसापासून हिंदू शिगार परिधान करुन तर धर्माच्या पारंपारिक चालत आलेल्या रितीरीवाजाला रोठ म्हणून हा सण साजरा केला जातो या सण साजरा करण्यासाठी नोकरी व व्यवसायाच्या निमीत्त बाहेर गावाला गेले असलेले नागरिक या दिवशी आपल्या गावात आपल्या घरी एकत्र येतात यांच्या घरी होते.

कानबाई मातेची स्थापना नारायण नेवे, उत्तम पाटील, निवा पाटील, मधूकर सावळे, नथ्थु पाटील अशा एकुण पाच घरी कानबाई मातेची स्थापना करण्यात आली होती. स्थापनेच्या रात्री व दुसऱ्या दिवशी श्री समर्थ वासुदेव बाबा भजनी मंडळ भजन-गायन करीत कानबाईला गावाबाहेर आणले जाते त्या ठिकाणी महिला, पुरुष, मुली मुले असे सर्वजन यात मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात नंतर वाजत गाजत कानबाई ला गाव विहिरीजवळ आनले जाते व विधीवत पुजाविधी करुन पाण्यात विसर्जीत केले जाते त्या यावेळी गोकुळ कोळी,दत्तु नेवे, पुंडलिक पाटील, अरुण कोळी,संजय चौधरी,आबा राजपुत, ज्ञानेश्वर राजपूत, युवराज पाटील, मयाराम धनगर, उत्तम पाटील, कौतिक कुमार, नथ्थू धनगर, संजू कोळी, नाना पाटील. दिनेश पाटील, स्वप्निल कोळी यासर्वांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content