मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मतदान कार्डला आधार कार्ड संलग्न करण्याचं उत्कृष्ट काम केल्याबद्दल मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचेती यांचं जिल्हा पुरवठा अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी श्री सूर्यवंशी यांनी अभिनंदनाचं पत्र पाठवत त्यांच्या कामाचा गौरव केला आहे.
निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन विधी आणि न्याय मंत्रालयांद्वारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम २०२१ अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा केल्या आहेत.
यामध्ये कलम २३ नुसार मतदान यादीतील तपशील जोडण्याकरता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून निश्चितपणे आधार कार्डची माहिती संग्रहित करणे बाबतच्या सूचनाप्रमाणे आधार जोडणीच्या कार्यक्रमास दि. १ ऑगस्ट २०२२ ते ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत ८० ते ९५ टक्के असं उत्कृष्ट काम केल्यामुळे मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे नोंदणी अधिकारी श्री.सूर्यवंशी यांनी मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचेती यांचं अभिनंदन अभिनंदन केलं आहे.