क्षत्रिय माळी समाजातर्फे उद्या शेतकरी पुरस्कार, गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

mali samaj

 

जळगाव प्रतिनिधी । येथील क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळातर्फे संत सावता प्रगतीशील शेतकरी पुरस्कार-२०१९ आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन उद्या दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते 1 वाजेदरम्यान पिंप्राळा बाजार रोड जवळ, श्रीरत्न कॉलनीतील भोईराज भवन येथे करण्यात आले आहे.

याबाबत आधिक माहिती अशी की, या कार्यक्रमाला प्रमुख सत्कारार्थी लासूर येथील प्रगतीशील शेतकरी सुरेश माळी, प्रमुख पाहूणे म्हणून शिंदखेड्यातील तहसीलदार सुदाम महाजन आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प.सदस्य, नानाभाऊ महाजन यांची विशेष उपस्थितीत असणार आहे. प्रत्येक वर्गातून सर्वाधिक गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. इयत्ता 1 लील (मराठी/ सेमी इंग्रजी/ इंग्रजी ) प्रत्येकी विद्यार्थ्यांना 101 रु. रोख पारितोषिक, इ 2 री (मराठी/ सेमी इंग्रजी/ इंग्रजी ) प्रत्येकी विद्यार्थ्यांना कै. विक्रम ओंकल महाजन (अमळनेर) यांचे स्मरणार्थ रोख १०१ पारितोषिक चंद्रवदन महाजन यांच्याकडून देण्यात येणार आहे. इ 3री (मराठी/ सेमी इंग्रजी/ इंग्रजी) विद्यार्थ्यांना दगा मुका महाजन (पिंपळी) रोख पारितोषिक 101 रु. रविंद्र भानुदास (दाते), इ 4 री (मराठी/ सेमी इंग्रजी/ इंग्रजी) विद्यार्थ्यांना रोख 101 रु. प्रत्येकी रतन महाजन (दाते), इ 5 वी (मराठी/ सेमी इंग्रजी/ इंग्रजी) विद्यार्थ्यांना कै. रतिलाल भगवान माळी (आंबापिंप्री) यांचे स्मरणार्थ 101 रु. प्रत्येकी ट्राफिक पोलीस शिवाजी माळी (दाते), इ 5 वी शिष्यवृत्ती (मराठी/ सेमी इंग्रजी/ इंग्रजी) विद्यार्थ्यांना समाजरत्न कै. चिंधू दला महाजन यांचे स्मरणार्थ 101 रु. प्रत्येकी राकेश महाजन (दाते), इ 6 वी (मराठी/ सेमी इंग्रजी/ इंग्रजी) जिनाबराव रायो चव्हाण यांच्यातर्फे 101 रु. रोख पारितोषिक, तसेच इ. 7वी, 8वी, 9वी, 10 वी स्टेट बोर्ड, 10वी इंग्रजी विषयात प्रथम, इ. 12वीत मुला-मुलींमधून प्रथम, डिप्लोमा (इंजिनिअरिंग), पदवी इंजिनिअरिंग, आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांनाही पारितोषित देण्यात येणार आहे.

Protected Content