कृउबा परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून तरूणाची १२ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जुना आसोदा रोडवरील समर्थ कॉलनीत राहणारे भाऊलाल कृष्णदेव चौधरी (वय-३८) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी २ जुलै रोजी सकाळी ७ वाजता भाऊलाल हे भाजीपाला घेण्यासाठी दुचाकी (एमएच १९ एझेड २०३३) ने कृषी उत्पन्न बाजार समितीत आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी कृषी उत्पन्न बाजार परिसराच्या आवारात लावलेली होती. ८.३० वाजेच्या सुमारास बाजार करून दुचाकीजवळ आले असता त्यांना त्यांची दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. रविवारी ३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.

Protected Content