पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील बहुळा येथील प्रकल्पास माजी मंत्री कै. के.एम. बापू पाटील यांच्या स्मरणार्थ कृष्णा सागर असे नाव दिले जाणार असून यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, पाचोरा-भडगाव विधानसभाच नव्हे तर जिल्ह्याच्या विकासात माजी मंत्री दिवंगत के.एम. बापू पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. यामुळे त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी बहुळा धरणास त्यांच्याच नावावरून कृष्णा सागर असे नाव देण्यात येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच आमदार किशोरआप्पा पाटील यांनी दिली होती. हा नामकरण सोहळा आज सकाळी पार पडणार आहे. यात दिवंगत के.एम. बापू पाटील यांच्या पत्नी गं.भा. कमलताई पाटील यांच्या हस्ते नामकरण करण्यात येणार असून याप्रसंगी आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यासह पक्षाचे विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यर्त्यांची उपस्थिती राहणार आहे. परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.