फैजपूर ता. यावल प्रतिनिधी | महावितरण मंडळाने तातडीने पंपासाठी वीजपुरवठा सुरळीत करावा व बील अभावी तोडलेला वीज पुरवठा तात्काळ जोडवा, अन्यथा रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा भाजप व भाजप किमान मोर्चातर्फे फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सातत्यपूर्ण अतिवृष्टीमुळे पावसाने खरीप हंगामात शेतकरी मोठया कर्जाच्या खाईत गेला असतांना मात्र कसामसा रब्बीच्या पेरणीची लगबगीला लागला. असताना महावितरणकडून कृषी वीज मोटर पंपा बील थकवाकी वसुलीसाठी थेट वीज ट्रान्सफर्मर वीजपुरवठा खंडित करून आडमुठेपणा अवलंबला केला जाऊन महावितरण व राज्य शासन ऐन दीपावली च्या सणात मोठा अनर्थ करून शेतकरी ची दीपावली अंधारात करते की काय असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी मांडला आहे. गेल्या दोन दिवसा पूर्वीच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे सावदा यावल प्रशासकीय दौऱ्यावर असतांना शेतकऱ्यांशी संवाद साधून सुरळीत वीज पुरवठा व वीज तोडणी तात्काळ थांबविण्यासाठी कारवाईचे आश्वाशित केले होते मात्र पालकमंत्री यांच्या या आश्वासनला महावितरण हरताळ फासत आहे. असा सूर व्यक्त केला जातो आहे.
दि. २६/२०/२०२१ रोजा सकाळी ११ वा फैजपूर कृषी उत्पन्न बाजार उपसमिती येथून शिस्तबद्ध मोर्चा काढण्यात येत त्यांची सांगता प्रांताधिकारी कार्यालय येथे एका सभेत रूपांतर होत तेथे भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य हर्षल पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मसाका चेअरमन शरद महाजन, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी यांनी मोर्चाला संबोधित केले प्रास्ताविक सरचिटणीस विलास चौधरी यांनी केले.
याप्रसंगी सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवणे याच्याशी प्रांताधिकारी कडलक व किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण बापू यांनी भ्रमणध्वनी द्वारा संवाद साधला असता त्यांनी काहीसा दिलासा दिला.तर प्रांताधिकारी यांनी आपल्या भावना तात्काळ शासनापर्यंत पोहचविण्याचे अश्वाशीत केले.
याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश हेगडे, तालुका सरचिटणीस उज्जैन सिंग, राजपूत जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नितीन राणे, तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, शहराध्यक्ष अनंता नेहेते, सरचिटणीस संजय सराफ, माजी नगराध्यक्ष बी के चौधरी, जि.प सदस्य सविता भालेराव, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष सागर महाजन माजी सभापती डॉ.नरेंद्र कोल्हे, कृषि उत्पन्ना उपसभापती उमेश पाटील, सदस्य योगीराज बराटे, जिला युवा मोर्चा सरचिटणीस राकेश फेगडे, हर्षद महाजन यशवंत तळेले, वसंत परदेशी, राजेश महाजन, मिठाराम सरोदे, अतुल भालेराव, प्रमोद वायकोळे, अनंता फेगडे यासह पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होता.