यावल प्रतिनिधी । येथील पंचायत समिती कृषी विभागाचे अधिकारी राहुल महाजन यांची जळगाव येथे बदली झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवांसाठी महाजन यांनी संवाद साधुन शेतकऱ्यांसाठी शासनाच्या सर्व योजना मिळुन देण्याचे कार्य केले आहे. महाजन यांनी पंचायत समितीमध्ये मागील चार वर्षापासुन कार्यरत असून, कार्यतत्पर व शेतक-यांच्या मदतीस धावून जाणारे, शेतक-यांना समय सुचकतेनुसार शेती विषयक अचुक मार्गदर्शन करून उल्लेखनीय कार्याचा ठसा त्यांनी उमटविला आहे. शेतकऱ्यांसाठी शासकीय योजनेव्दारे शेतकरी बांधवांसाठी शेतीविषयक अवजारे वितरीत करणे. सर्व शेतक-यांशी समतोलाने कार्य करणे. तसेच, महाजन यांना तत्कालीन गटविकास अधिकारी व कार्यरत असलेले गटविकास अधिकारी किशोर सपकाळे व पंचायत समितीच्या सदस्यांनी कार्यतत्पर, प्रमाणिक आदर्श कृषी अधिकारी म्हणुन प्रशंसा मिळवली असुन, त्यांची जळगाव येथे जिल्हा परिषद मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. परंतू महाजन यांनी कृषी विभागात केलेले कार्य हे सदैव आदिवासी शेतकरी बांधव्यांच्या व यावलकरांच्या स्मरणात राहिल.