जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील सावदा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील कृषीदूतांचे आगमन झाले. ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम सन २०२४-२५ या वर्षीचा कार्यक्रमा अंतर्गत. डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण कृषी जागरूकता हा कार्यक्रम कृषिदूत राबवणार आहेत. शेती पिकाबाबत येणाऱ्या समस्या, त्यावर उपाय योजना तसेच जास्त उत्पादन घेण्यासाठी नवीन आधुनिक तंत्रज्ञान युक्त शेती पध्दत, विविध प्रकारच्या बियानांचा वापर, फळबाग लागवड पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देत उत्पादकता वाढवण्यासाठी काय करता येईल याचे सखोल संशोधनपर विश्लेषणात्मक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कृषीदुत पार पाडणार आहेत. सोबतच शेतकरी हिताचे मार्गदर्शन कृषीदुत शेतकऱ्यांना करणार आहेत. त्यासाठी कृषीदूत म्हणून प्रणव बानाईत, लहू चव्हाण श्रेयस पाटील, मोहित साळुंखे, सुजल सरोदे, विशाल इंगळे, रोहित पावरा, संकेत शिरसाठ यांचा सहभाग असणार आहे.
पुढील दोन महिन्यासाठी कृषिदूत या गावात राहणार आहेत .या साठी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. आर . सोहानी व संबंधित विषयातील विषय विशेष तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. शेतकऱ्यांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषीदूत आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात आले असून नगरपरिषद सावदा व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने या कृषिदूतांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सावदा नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी मा. भुषण वर्मा साहेब व न.पा सावदा चे कर्मचारी उपस्थित होते.