जळगाव प्रतिनिधी । किचन विक्रेत्यावर किरकोळ कारणावरून कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे. कटारिया यांनी आज चार वर्षाचा सश्रम कारावास ठोठावला. याशिवाय पाचशे रुपये दंड आणि दंड नभरल्यास एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. पिंटू उर्फ संजय रामलाल गायकवाड करमाड ता. जळगाव असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, 28 मार्च 2018 रोजी युनुस इस्माईल शेख हा करमाड या गावी चिकन विक्रीचे काम करण्यासाठी आला असता सायंकाळी 5 त 5.30 वाजेच्या सुमारास आपल्या दुकानाची आवराआवर करीत असताना आरोपी पिंटू उर्फ संजय रामलाल गायकवाड हा तेथे आल्याने त्याने कोंबड्या संपल्या का असा प्रश्न विचारला त्यावर युनुस इस्माईल शेख याने हो म्हटल्यावर त्याचा त्याला राग आल्याने पिंटू गायकवाड याने हातातील कोयत्याने युनुस इस्माईल शेख यांचावर सपासप वार केले. त्यावेळेस फिर्यादी युनूस शेख याला उपस्थित असलेल्या पिराजी सोनवणे अशोक महाराज वगैरेंनी त्याला पळासखेडे व त्यानंतर फिर्यादीच्या नातेवाईकांनी जळगाव येथील न्यूक्लिअर इस्पितळा दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्याची माहिती फिर्यादी युनुस इस्माईल शेख याने दिल्यावर जामनेर पोलीस स्टेशनला याबाबतचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपीच्या विरुद्ध तपास केल्यावर जून 2018 मध्ये पोलीस उपनिरीक्षक सुनील बापू कदम यांनी न्यायालयात चार्जशीट दाखल केले. सदर खटल्याचे काम आरोपीच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यासाठी सरकार पक्षाकडून एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले.
न्यायालयासमोर आलेला पुरावा तसेच इतर पुरावे ग्राह्य धरून आरोपी पिंटू उर्फ संजय रामलाल गायकवाड याला जिल्हा व सत्र न्यायाधीशआर.जे. कटारिया यांनी चार वर्षे सश्रम कारावास पाचशे रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी तर आरोपीकडून ॲड.ज्ञानेश्वर बोरसे, ॲड.विजय दर्जी यांनी काम पाहिले.