कोटेचियन्सची आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी

भुसावळ –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयातंर्गत कोटेचियन्स ॲल्युम्नी असोसिएशन व कमोडिटी बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने डोंगर दे या आदिवासी परिसरात दिवाळीनिमित्त फराळ ,कपडे व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.

 

दिवाळीत दुर्गम भागातील आदिवासी गरजूंना पण आनंद मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी माजी विद्यार्थी संघटनेच्या आजीवन सभासदांनी मदत केली. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद मुलांची शाळा डोंगर दे तालुका यावल येथे घेण्यात आला. कार्यक्रमाला शाळा केंद्रप्रमुख मोहम्मद हबीब तडवी हे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी समाज भान ठेवून राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. ही शाळा मागासलेल्या व दुर्गम भागात आहे. अशा दुर्गम शाळेत विद्यार्थी यायला तयार नसतात. आर्थिक हालाकीमुळे विद्यार्थ्यांना पाटी-पेन्सिल मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना केलेली मदत  प्रेरणादायी ठरेल.

मुख्याध्यापक मुबारक रमजान तडवी यांनी आपले महाविद्यालय सतत या भागात विविध उपक्रम राबवून आपले सामाजिक भान जपत  असल्याची माहिती दिली.

या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा, उपप्राचार्य व कोटेचियन्स ॲल्युम्नी असोसिएशन अध्यक्षा अनिता कोटेचा यांचे मार्गदर्शन मिळाले. सूत्रसंचालन प्रा. निलेश गुरचळ यांनी केले तर आभार उपक्रम संयोजिका प्रा. दिपाली पाटील यांनी मानले.

माजी विद्यार्थिनी डॉ. ममता पाटील , राजश्री भालेराव, अंजुम तडवी,  कृपाली बरडे, माधुरी राजपूत, प्रा. लक्ष्मी तायडे  व  आजी विद्यार्थिंनीनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मदत केली. विशेष मदत सचिन पंडित यांनी केली.

Protected Content