यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथील शाळेत स्व. हाजी नथ्थु दादा पटेल सार्वजनीक वाचनालय व बॉर्डर हेल्थकेअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शालय साहित्य वाटप करण्यात आले.
कोरपावली तालुका यावल येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या सौ. माधुरी किशोर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणुन बाजार समितीचे उपसभापती राकेश वसंत फेगडे, मसाकाचे माजी संचालक बारसु रामदास नेहते, जळगावचे नगरसेवक ईब्राहीम मुसा पटेल, युनुस पिंजारी, काँग्रेसचे कार्यकर्ते पुंडलीक बारी, गट शिक्षणाधिकारी एजाज शेख, जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक धनराज कोळी, सामाजीक कार्यकर्त संदीप प्रभाकर सोनवणे, काँग्रेस तालुका सरचिटणीस भरत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात २१० विद्यार्थी व विद्यार्थीनींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सूत्रसंचलन डी.डी. कोळी यांनी केले. तर आभार डी.एच. जैन हायस्कुल चे उपशिक्षक संतोष वानखेडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष जलील सत्तार पटेल, कय्युम सरवर पटेल, जुबेर कुतुबुदीन पटेल, हर्षल वसंत महाले आदींनी सहकार्य केले.