अनिल सावंत यांना कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल सावंत यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था (संघ), नाशिक यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार” जाहीर झाला आहे. नाशिक येथील विशाखा हॉल, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, गंगापूर रोड येथे ४ मे २०२५ रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

अनिल सावंत हे गेल्या अनेक दशकांपासून चर्मकार समाजात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. ते सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून, मालन वसतिगृह, पाचोरा येथे अधीक्षक, तसेच दादासाहेब गजमल को-ऑप बँकेचे संचालक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले असून, अनेक वृत्तपत्रांमध्ये कार्यानंतर सध्या “झटपट लाईव्ह न्यूज”चे संपादक म्हणून काम पाहत आहेत. तसेच, गाळण बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता व सहकार क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

<p>Protected Content</p>