मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करतांना त्यांनी पश्चीम बंगालमधील एका संशयास्पद व्यवहार असणार्या कंपनीकडून मदत स्वीकारल्याचा आरोप केला आहे.
संजय राऊत यांनी कालच आज आपण मोठा धमाका करणार असल्याचा दावा केला होता. या अनुषंगाने त्यांनी आज दोन ट्वीट केले. संजय राऊत यांनी किरीट का कमाल, असे म्हणत एक ट्वीट केले आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये किरीट सोमय्या यांनी एका कंपनीविरोधात आरोप केले होते. त्यानंतर कंपनीच्या प्रमुखाची ईडीने चौकशीदेखील केली. त्यानंतर २०१८-१९ मध्ये सोमय्या यांच्याशी संबंधित युवक प्रतिष्ठानला याच कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. क्रोनोलॉजी समजिए असं म्हणत राऊत यांनी आपण या प्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले.
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याच्या पार्श्वभूमिवर, आता राऊत यांनी त्यांच्यावर नवा आरोप केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.