Home Cities पाचोरा आ.किशोर पाटील यांची वाडे, बांबरुड परिसरात प्रचार रॅली

आ.किशोर पाटील यांची वाडे, बांबरुड परिसरात प्रचार रॅली


kishor patil rally

पाचोरा, प्रतिनिधी | येथील शिवसेना-भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर पाटील यांनी आज (दि.११) भडगाव तालुक्यातील वाडे-बांबरुड या भागात प्रचार दौरा करीत जनतेचे आशीर्वाद घेतले.

 

आमदार पाटील यांच्या दौऱ्यात जनतेचा प्रतिसाद लाभत आहे. आजच्या या दौऱ्यात आ. पाटील यांनी विविध विकास कामे केल्याचा दावा करीत, मतदार संघ सुफलाम सुजलाम करण्यासाठी आपणास पुन्हा विजयी करण्याचे आवाहन केले.

या दौऱ्यात त्यांच्यासोबत  जि.प.सदस्य भुरा आप्पा, पंचायत समिती सभापती रामकृष्ण पाटील, विकास तात्या, रावण भिल, चित्ते सर, तालुका प्रमुख विलास पाटील, अनिल पाटील, भावसाहेब पाटील, सतिश पाटील, काशिनाथ महाजन, कैलास नाना, सुमित पाटील यांच्यासह शिवसेना व युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound