राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी किशोर पाटील

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील खर्ची येथील किशोर पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

तशा आशयाचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.पत्रावर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबुब शेख यांची सही आहे तसेच पत्रात त्यांना पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांच्या विकासात भरीव कार्य करून पक्ष संघटना मजबुत उभी करण्याचे म्हटले आहे. किशोर पाटील यांच्या निवडीचे राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी तथा सदस्यांनी स्वागत केले आहे.

 

Protected Content