मुंबई प्रतिनिधी | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज महाविकास आघाडी सरकारमधील घोटाळ्यात सहभागी असणार्या तब्बल ११ जणांची यादी जाहीर केली असून यात रश्मी ठाकरे यांचाही समावेश आहे.
किरीट सोमय्या यांनी सातत्याने महाविकास आघाडी सरकारच्या विविध नेत्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप केले आहेत. यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारला धारेवर धरले आहे. यात त्यांनी आज आघाडी सरकारमधील अकरा जण हे भ्रष्टाचारात अडकले असल्याचा आरोप केला आहे.
या संदर्भात किरीट सोमय्या म्हणाले, की ही ठाकरे सरकारची ‘घोटाळा इलेव्हन’ आहे. यामध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी अनधिकृत बांधकाम केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वसुली कांडात ईडीने पुरावे दिले. परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट, परिवहन विभागात चौकशी, शिवसेना खासदार भावना गवळी यांनी बँकेचे पैसे लाटले, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी गाळे ढापले, माजी मंत्री रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरेंनी मिळून जमीन घोटाळा केला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची एसआरएचा भूखंड प्रकरणी चौकशी सुरु, छगन भुजबळांवर आरोप आहेत. शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी णAएमध्ये पैसे पाठवले तर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगला बांधला आणि पाडला.
या सर्व मान्यवरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.