Home Cities भडगाव भाजपा भडगाव तालुका सरचिटणीसपदी किरण शिंपी यांची नियुक्ती

भाजपा भडगाव तालुका सरचिटणीसपदी किरण शिंपी यांची नियुक्ती


भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीला नवे बळ मिळाले असून किरण शिंपी यांची तालुका सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कार्याला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

किरण शिंपी यांनी विद्यार्थी जीवनापासूनच संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. २०११ ते २०१८ या कालावधीत त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध जबाबदाऱ्यांवर काम करत तालुकाप्रमुख, भाग प्रमुख, जिल्हा वस्तीगृहप्रमुख, जिल्हा संयोजक तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशी महत्त्वाची पदे भूषवली. या काळात त्यांनी युवकांमध्ये संघटनात्मक जाणीव निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

यानंतर २०१९ ते २०२२ या कालावधीत त्यांनी भाजपा युवा मोर्चा भडगाव तालुका अध्यक्ष म्हणून कार्य केले. तसेच २०२२ ते २०२४ या काळात भाजपा युवा मोर्चा पाचोरा विधानसभा संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडली. या पदांवर कार्यरत असताना त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आणि कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवण्याचे काम केले.

त्यांच्या कार्यातील सातत्य, नियोजन कौशल्य आणि संघटनात्मक अनुभव लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीने त्यांची भडगाव तालुका सरचिटणीसपदी निवड केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या कामकाजात अधिक परिणामकारकता येईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या निवडीबद्दल मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, भाजपा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राम सातपुते, खासदार स्मिता वाघ, प्रदेश चिटणीस भैरवी वाघ पलांडे, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, तसेच अमोल शिंदे, दिलीप वाघ, वैशाली सूर्यवंशी आणि विनोद नेरकर यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

किरण शिंपी यांच्या नियुक्तीमुळे भडगाव तालुक्यात भाजपाच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळण्याची शक्यता असून, आगामी काळात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound