चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी, चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित अध्यापक विद्यालयाचे माजी प्राचार्य व प्रताप विद्या मंदिर शाळेतील उपशिक्षक किरण पाटील यांना राज्यस्तरीय ‘माझी माई पुरस्कार २०१९’ डॉ सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
सेवाव्रत बहुद्देशीय संस्था नागपूर व महर्षी मार्कडेश्वर प्रतिष्ठान नांदेड आणि माईकट्टा महाराष्ट्र राज्य साहित्य प्रतिष्ठान नागपूरतर्फे राज्यस्तरीय ‘माझी माई पुरस्कार २०१९’ हा सामाजिक वर्तुळातील सेवाभाव व कार्यानिमित्त नागपूर येथील रेशीमबाग मैदानाजवळील सुरेश भट सभागृहात किरण पाटील यांना अपंगांची आई मा. डॉ सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते व आमदार मोहनजी मते यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला. यावेळी सेवाव्रत बहुद्देशीय संस्थेच्या सीमा पाटील नागपूर व महर्षी मार्कंडेश्वर प्रतिष्ठानच्या अनुराधा मारुती गुंडेवार नांदेड यांच्या उपस्थितीत दि. २७ नोव्हेंबर २०१९ रोजी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा.किरण पाटील यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलदास गुजराथी, उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, सचिव माधुरी मयूर, चंद्रहासभाई गुजराथी व संचालक मंडळ यांच्यासह संस्थेचे समन्वयक गोविंद गुजराथी, उल्हास गुजराथी, डी. टी. महाजन, मुख्याध्यापक डी.व्ही. याज्ञीक, उपमुख्याध्यापक डी.के.महाजन, पर्यवेक्षक वाणी, आर.आर.शिंदे, वाय.एच.चौधरी संस्थेतील सर्व विभाग प्रमुखांनी व समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.