खिर्डी बुद्रुकच्या लोकनियुक्त सरपंचपदी किरण कोळी

 

koli

रावेर प्रतिनिधी । खिर्डी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी नुकताच झालेल्या निवडणूकीत किरण कोळी यांची निवड झाली आहे.

या ग्रामपंचायतीच्या सरपंच हे अपात्र ठरले होते. त्यामुळे प्रशासनाने येथील निवडणूक घोषित करत त्यासाठी रविवारी मतदान घेण्यात आले. लोक नियुक्त सरपंच पदासाठी किरण कोळी, मधुकर ठाकूर, बेबा भिल, सायरा कोचुरे हे उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यापैकी किरण कोळी यांना ६४६ मते, मधुकर ठाकूर यांना ४९९ मते, बेबाबाई भिल ४६४, तर सायरा कोचुरे यांना २६० मते मिळाली असून नोटा ३२ मते आहेत. त्यामुळे सर्वाधिक मते किरण कोळी यांना मिळाल्याने त्यांना या पदासाठी विजयी घोषित करण्यात आले. मत मोजणीला यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणूक सी.आर.महाले यांनी काम पहिले. त्यांना सहाय्यक म्हणून एस.बी.लोळपे यांनी मदत केली. गौरखेडा येथे झालेल्या ग्रामपंचायत सदस्याच्या पोट निवडणुकीत साहेबराव पाटील यांना १०१ मते मिळाल्याने ते विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी राहुल पाटील यांना ८२ मते मिळाली आहे. यावेळी पोलिसांन कडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Protected Content