यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील किनगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.किनगाव या संस्थेची सभा बुधवार दि. २९ रोजी संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली त्यात व्हा.चेअरमन पदी गजानन रामचंद्र वराडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व संगितम ट्रॅव्हलचे सर्वसर्वा विनोदकुमार पंडीतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत चेअरमन व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त विभागीय व्यवस्थापक विनोदकुमार देशमूख, संचालक उमाकांत पाटील, व्ही.मार्टचे संचालक मनिष विजयकुमार पाटील, तुषार चौधरी, देवीदास महाजन, सुरेशपाटील, विद्याबाई पाटील, यमुना चौधरी, जसुबाई तडवी, रविंद्र काटे, प्रशांत पाटील इ.सह. माजी सरपंच टीकाराम चौधरी, प्रगतशील शेतकरी संभाजी वराडे, सचिव प्रमोद सुरवाडे, कर्मचारी प्रशांत पाटील, भिवसन पाटील, प्रकाश ठाकुर इ. उपस्थित होते. यासाठी निवड प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय आधीकारी म्हणन के. व्ही. पाटील यांचे सहकार्य लाभले. या सभेत उमाकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले तर संभाजी वराडे यांनी आभार व्यक्त केले.


