यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील एका तरूणाने कौटुंबिक वादातून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीला आले. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किनगाव बु॥ तालुका यावल येथील राहणारे नवल दगडु भोई वय ३६ वर्ष गावात शेंगदाणे फुटाणेचा व्यवसाय करणारा या तरूणाने आज ३१ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छताच्या हुकला दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मयत नवल भोई याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई व भाऊ असा परिवार आहे. यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय धनंजय पाचपोळे हे करीत आहे .