
यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील किनगाव येथील सुरु असलेल्या काँक्रीटकरणाच्या कामाची परिसरात सुरू असलेल्या विविध कामांची चोपडा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आज पाहणी केली.

यावल तालुक्यातील किनगाव येथील चौफुली प्रवेशव्दार ते मुख्य चौक जामा मस्जिद या प्रमुख मार्गाच्या सुमारे ८५ लाख रुपयांच्या निधीतुन तयार होत असलेल्या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाची आज सकाळी चोपडा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या सोबत शिवसेनेचे यावल तालुका संघटक गोपाळ चौधरी, आडगाव येथील माजी सरपंच योगेश पाटील, यावल तालुका युवा सेनेचे अध्यक्ष गोटु सोनवणे, किनगाव ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच बबलु कोळी, मनोज देवरे, भाऊसाहेब धनगर, यावल पं.स.माजी सदस्य भारसिंग बारेला, बाळु कोळी, रोहिदास महाजन, सुधाकर पाटील, दिनेश साळुंखे, श्रावण कोळी, किनगाव ग्रा.प.चे माजी सदस्य जनार्दन कोळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य प्रशांत पाटील यांच्यासह यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभियंता सि.डी. तायडे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी किनगाव वाघझिरा या मार्गावरील पुर्ण झालेल्या कामाची ही पाहणी केली.



