किलबिल बालक मंदिरात अवतरले विठ्ठल –रुखमाई

IMG 20190716 WA0030

जळगाव ,प्रतिनिधी ।  विठ्ठल विठ्ठल जय हरी…….विठ्ठल नामाची शाळा भरली…….पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम …… चा जय घोष तसेच विविध संतांच्या वेशभूषा साकारलेले चिमुकले. पारंपारिक नववारी साडी नेसलेल्या चिमुकल्या किलबिल बालक मंदिरातर्फे काढण्यात आलेल्या दिंडीत सहभागी झाले होते.

 

 

किलबिल बालक मंदिर शाळेच्या प्रवेश दाराजवळ स्वागतासाठी रेखाटण्यात आलेली सुबक व आकर्षक छटांची रांगोळी…….टाळ आणि चीपाडांतून निघणारे सुमधुर संगीत……..विठ्ठल भक्तीत रंगलेले पालक ,शिक्षक ,तसेच शिक्षकेतर कर्मचारी असे भक्तिमय व उत्साहाचे वातावरण किलबिल पालक मंदिरात बघावयास मिळाले. के.सी.ई.सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर येथे आषाढी एकादशीनिमित्त बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक नामदेव पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यांनी विठ्ठल नामाची शाळा भरली हे भजन सदर केले. शाळेपासून ते पोस्टल कॉलनीजवळ असलेल्या हरी मंदिरपर्यंत ही दिंडी होती. दिंडीत चिमुकल्यांनी विठ्ठल नामाचा एकच गजर केल्याने वाटसरूचे याकडे लक्ष वेधले जात होते. शाळेतील विद्यार्थी चेतन बारी याने विठ्ठलाची तर श्रद्धा सूर्यवंशीने रुखमिनीची वेशभूषा हुबेहूब साकारली होती. गेल्या दहा वर्षापासून आषाढीनिमित्त दिंडीचे आयोजन करण्यात येते अशी माहिती मिळाली आहे . किलबिल बालक मंदिरात गेल्या दहावार्षापासून दिंडीचे आयोजन केले जाते .याप्रमाणेच गोकुळाष्टमी ,नागपंचमी ,दिव्याची अमावस्या ,गणपती उत्सव ,राखी पोर्णिमा हे सण उत्सव साजरे केले जातात प्रसंगानारूप मुलांना खाऊचे वाटप करण्यात येते.मुलांप्रमाणेच पालकांनाही शाळेत आमंत्रित केले जाते .खानदेशातील पारंपारिक सन उत्सवाची माहिती मुलांना व्हावी व त्याचे महत्व टिकून राहावे हा साजरा करण्यामागचा उद्देश असल्याचे मुख्यध्यापिका मंजुषा चौधरी यांनी सांगितल.

Protected Content