यावल, प्रतिनिधी | शहरात विविध भागातुन लहान मुलं पळवुन नेणारी टोळी सक्रीय असल्याची लेखी तक्रार येथील बजरंग दल आणि विश्व हिन्दुपरिषदच्या वतीने तहसीलदार, पोलीस निरिक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.
बजरंग दल आणि विश्व हिन्दुपरिषदच्या वतीने तहसीदार जितेन्द्र कुवर व पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासुन यावल शहरात आणि फिल्टर प्लॅन तसेच बोरावल गेट आणि ताकेश्वर मंदीर परिसरात लहान मुलं पळवून नेणारी टोळी सक्रीय झाल्याचे म्हटले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे. शहरातील तारकेश्वर मंदीराच्या मागील बाजुस असलेल्या पावरी वस्ती मध्ये २ दिवसापुर्वी काही अज्ञात रात्री ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास लहान मुलांना उचलुन पळवुन घेवुन जात असतांना नागरीकांनी त्यांना हटकवले असता ती टोळी पळवुन जाण्यात यशस्वी ठरली. नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला असता ती टोळी पळून जाण्यात यशस्वी ठरली. यासर्व प्रकाराने नागरिकांमध्ये भीती पसरली असून महसूल यंत्रणा, पोलीस प्रशानने याची गंभीर दखल घेऊन त्या टोळीचा पर्दाफाश करावा असी मागणी कण्यात आली आहे. निवेदन निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांना देण्यात आले. निवेदन देते वेळी बुध रतनसिंग बारेला, शांताराम शिवराम भिल्ल, विकास सुधाकर भिल्ल, यांच्यासह आदी कार्यकर्त उपस्थित होते.