Home क्राईम अल्पवयीन मुलीचे अपहरण ; एकावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचे अपहरण ; एकावर गुन्हा दाखल

0
183

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील एका भागात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. पिडीत मुलगी ही मंगळवारी ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत घरी होती त्यानंतर ती बेपत्ता झाली. त्यामुळे तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू तिच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर पालकांनी अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून कुणाल ज्ञानेश्वर भालेराव रा. जळगाव याने मुलीला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यानुसर रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी कुणाल भालेराव याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound