Home क्राईम जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण : गुन्हा दाखल

जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण : गुन्हा दाखल

0
164

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता समोर आली आहे. या संदर्भात मंगळवारी २३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. दरम्यान सोमवारी २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी ही घरी असताना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून तिला ठोस लावून पळून नेले. दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी तिच्या सर्वत्र शोध घेतला, परंतु तिच्या संदर्भात कुठलीही माहिती मिळेल नाही, अखेर तिच्या पालकांनी मंगळवारी 23 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता एमआयडीसी पोलीस त्यानंतर घेऊन याबाबत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक कार्य करीत आहे.


Protected Content

Play sound