जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अवघ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने कसलेतरी आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना शुक्रवारी १६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली असून, याप्रकरणी शनिवारी १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पिडीत मुलगी ही शुक्रवारी १६ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र तिचा कुठेही पत्ता लागला नाही. तपासाअंती, तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले आहे.

अखेर पिडीत मुलीच्या वडीलांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्याच्या तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच ‘ई-साक्ष’ प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय देवराम पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



