Home क्राईम अल्पवयीन मुलीला पळविले; अज्ञातावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला पळविले; अज्ञातावर गुन्हा दाखल

0
50

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील एका गावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविले आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सविस्तर माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे.  मुलगी ही चाळीसगाव तालुक्यातील मामाकडे भेटण्यासाठी आली होती. दरम्यान गुरूवार २४ मार्च रोजी सकाळी ४ वाजता अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पडित मुलीच्या मामाच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार धर्मराज पाटील करीत आहे.

 


Protected Content

Play sound