पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील खेडीढोक येथे तीव्र पाणीटंचाई असतांनाही प्रशासनातर्फे उपायोजना करण्यात येत नसल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी हंडा मोर्चा काढून याचे निराकरण करण्याची मागणी केली.
खेडीढोक गावाला पुरेसे पाणी मिळावे याकडे सरपंच दुर्लक्ष करत असून ग्रामसेविका नियमित येत नाही. यामुळे संबंधीतांवर कारवाई करून पाणी टँकरच्या फेर्या वाढवून मिळावे या मागणीसाठी गावातील महिला, पुरुषांनी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढली. तहसीलदार ए. बी. गवांदे यांना उपसरपंच बाळू पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले. प्रशासनाने ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. या वेळी तहसीलदार गवांदे, नायब तहसीलदार पाडवी, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, हवालदार पंकज राठोड, सुनील साळुंखे, सुनील पवार, राकेश पाटील आदी उपस्थित होते.