रावेर प्रतिनिधी । खानदेश माळी महासंघातर्फे तालुका व परिसरातील सामाजिक विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच महिलांना सावित्रीच्या लेकी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून (दि.३) सोमवारी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
दरम्यान, सदर सोहळा येथील सावित्रीबाई फुले चौकात 3 जानेवारी सोमवार रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता होईल.
यावेळी आयोजित कार्यक्रमात याप्रसंगी समाज प्रबोधनासाठी प्रसिद्ध कथाकथनकार प्रा. व. पु. होले सावदा यांचे जाहीर व्याख्यान होईल. तसेच माजी नगराध्यक्ष डॉ. रंजना अकोले(रावेर), स्वतःच्या पतीला किडनी दान करणारी सौभाग्यवती लता मोसे (कर्जोद ता. रावेर), मुलाच्या शिक्षणासाठी सौभाग्याचं लेणं (मंगळसूत्र) विकणाऱ्या अनुसया महाजन (वाघोड ता. रावेर), उपशिक्षिका हेमलताचौधरी (खिरोदा.ता.रावेर), लोकनियुक्त सरपंच कविता बगाडे (शिंगाडी ता. रावेर) या पाच महिलांना पुरस्कार जाहीर झाला आहे. या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांना उपस्थितीचे असे आवाहन महिला जिल्हा कार्याध्यक्ष शकुंतला महाजन, कांतीलाल महाजन, पिंटू महाजन, प्रकाश महाजन व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले आहे.