जळगाव प्रतिनिधी । शहरातील खान्देश कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या एका फर्निशिंग गोडावूनला पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत कापड, गाद्यांसह इतर साहित्य असे लाखो रूपयांचा माल जळून खाक झाल्याची घटना घडली. चार अग्नीशमन बंबाने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीबाबत शहर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. सदरील आग कोणत्या कारण समोर आले नाही.
याबाबत माहिती अशी की, रेल्वे स्टेशन परिसरातील खान्देश मिल कॉम्प्लेक्समध्ये दिनेश पुरुषोत्तम पटेल रा. भिकमचंद जैन यांच्या मालकीचे ओम फर्निशिंग नावाचे दुकान आहे. दुकानात सोफ्यांचे कापड, पडदे, कारपेट, फोमच्या गाद्या आदींची विक्री केली जाते. दुकानासाठी आवश्यक सामान ठेवण्यासाठी दुकानदार पटेल यांनी दुकानाच्या समोर असलेल्या चंदन हॉटेलच्या बाजूला एक गोडावून भाड्याने घेतले होते. 7 एप्रिल रोजी सकाळी 4.30 वाजेच्या सुमारास गोडावूला आग लागल्याने गोडावून मालक सरोदे यांनी पटेल यांना फोनद्वारे महिती कळविल. माहिती मिळतात पटेल यांनी अग्नीशमन बंबाला कळविल्याने अग्नीशम बंबही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. चार बंबाद्वारे सदरील आग आटोक्यात आणण्यात आली. सकाळी लागलेल्या आगीत पदडे, कारपेट, फोमच्या गाद्या, सोफ्यांचे कापड असा माल पूर्ण जळून खाक झाला होता. आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही.