नगरदेवळा ता.पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । नगरदेवळा व परिसरातील भक्तांचे आराध्य दैवत असलेले तसेच शेकडो वर्षांची परंपरा असलेले येथील खंडेराव महाराज यात्रा उत्सव कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर यावर्षी म्हणजे आज १६ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.
प्रथम दिवशी पालखी मिरवणुकीने आठवडाभर चालणाऱ्या या यात्रोत्सवाची सुरूवात होणार असून येथील परिसरातील शेतकरी व कष्टकऱ्यांचे खास आकर्षण म्हणजे तगतराव मिरवणूक ही व स्थानिक लोककलावंत रतनभाऊ मंडळाचा तमाशा हे दिनांक १८ फेब्रुवारी रोजी होणार आहेत.तसेच जिल्हाभरातील पहेलवानांना आपले कसब दाखविण्याचे हक्काचे ठिकाण असलेला जंगी कुश्त्यांचा कार्यक्रम दिनांक २० फेब्रुवारी रविवारी पार पडणार आहे . कोरोना संबधित सर्व नियमांचे पालन करत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन यात्रा उत्सव समितीने केला आहे.