खडसेंनी आज घेतली पुन्हा पवारांची भेट, संपर्क कार्यालयावरील भाजपचा फलकही हटवला

pawar khadse

 

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सकाळी नागपूर येथे पुन्हा भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसेंच्या संपर्क कार्यालयावरील भाजपचे फलक काढण्यात आले आहे. त्यामुळे खडसे यांचे पक्षांतर निश्चित असल्याचे बोलेले जात आहे.

शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची अज्ञातस्थळी भेट झाल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तानुसार पवार-खडसे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे खडसे भाजपातून बाहेर पडणार याची शक्यता बळावली आहे. पंकजा भाजपमध्येच राहणार, पण माझा भरोसा धरु नका, असे उघड संकेत एकनाथ खडसेंनी गेल्या आठवड्यात गोपीनाथगडावरुन दिले होते. त्यानंतर आता चक्क मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसेंच्या संपर्क कार्यालयावरील भाजपचे चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले फलक काढल्याचेही समोर आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

Protected Content