जामनेर, प्रतिनिधी | “एकनाथराव खडसे नाराज नाहीत, माझे त्यांच्याशी पाच मिनिटांपूर्वी बोलणे झाले आहे, पक्ष त्यांच्याबाबतीत योग्य निर्णय घेतील”, असे स्पष्ट प्रतिपादन जिल्हा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज (दि.३) दुपारी पत्रकारांशी बोलताना केले.
यावेळी ते पुढे म्हणाले की, “ते कुठल्याही दुसऱ्या पक्षाच्या संपर्कात नाहीत, त्यांनी स्वत:ही ते स्पष्ट केले आहे. अद्यापही आणखी तिसरी यादी येणे बाकी आहे, त्यामुळे काहीही होऊ शकते”, असेही ते म्हणाले. स्वत: आ.खडसे यांच्या ऐवजी त्यांच्या कुटुंबातून दुसऱ्या कुणाला उमेदवारी देण्याची चर्चा असल्याबद्दल विचारले असता त्यांनी “तो त्यांचा मतदार संघ आहे, त्यांचा अधिकार आहे”, असे सूचक उत्तर दिले.