Home Cities मुक्ताईनगर मविआमध्ये खदखद; मुक्ताईनगराच्या जागेवर काँग्रेसने ठोकला दावा

मविआमध्ये खदखद; मुक्ताईनगराच्या जागेवर काँग्रेसने ठोकला दावा


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथे आज १ ऑगस्ट गुरूवार रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप पवार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील, निरीक्षक व जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वरभाऊ कोळी, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल हरून मुक्ती, प्रदेश सदस्य डॉ. जगदीश पाटील, अजमल पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्ताईनगर विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून याबाबतीत जिल्हाध्यक्ष पवार साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीला पूर्ण पणे तयारीला लागा असे आदेश दिले. ही जागा प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्याकडे पाठवलेल्या अहवालात मुक्ताईनगर विधानसभेच्या जागेची मागणी केलेली असून आपण पूर्णपणे तयारीत रहावे अशा सूचना जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीला देण्यात आल्या. याप्रसंगी तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष युवक काँग्रेस राजेंद्र जाधव, ओ.बी.सी. तालुका अध्यक्ष निखिल चौधरी, सुनील सुरवाडे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound