भुसावळ (प्रतिनिधी) येथील झेड.टी.सी.कॉर्डलाईनजवळ जाणाऱ्या मालगाडीचा धक्का लागल्यामुळे चाबीमनचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.११)सकाळी घडली.
झेड.टी.सी.गेट क्रमांक एक जवळील कॉर्ड लाईनवर आपली ड्युटी करणारा कर्मचारी धुन्नी बद्रीला (चाबीमन) जाणाऱ्या मालगाडीचा धक्का लागल्याने सकाळी ११:५५ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला असून शव १:३० वाजेपर्यंत तापलेल्या उन्हात पडून असल्याने प्रशासनाला माहिती देऊनही घटनास्थळी लोहमार्ग पोलीस कर्मचारी न आल्यामुळे प्रशासनाची कर्मचाऱ्यांबद्दलची बेपर्वाई दिसून आली आहे.