रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | केऱ्हाळा (ता रावेर) येथील २५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत वृत्त असे की, केऱ्हाळा (ता रावेर) येथील रहिवासी देवानन ज्ञानेश्वर महाजन याने बाथरूम मध्ये लोखंडी ऐंगला सुतळीच्या सहायाने गळफास लावून आत्महत्या केली. गजानन रामकृष्ण महाजन यांच्या खबरी वरुन रावेर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी सुनिल वंजारी करीत आहे.