जळगाव प्रतिनिधी – रावेर तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द येथील खेडी शिवारात दोन महिलांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. यावेळी रात्री उशीरापर्यंत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान याप्रकरण रात्री उशीरापर्यंत दोन संशयितांना रावेर पोलीसांनी गावातूनच ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द येथील नसीमा रुबाब तडवी (वय 50) व शालूबाई गौतम तायडे (वय 55) या दोन्ही मजूर महिला सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारस म्हशी व बकऱ्यासाठी चारा आणण्यासाठी गेल्या होत्या, मात्र रात्र होऊनही त्या दोन्ही घरी न परतल्याने त्यांची शोधशोध घरच्या लोकांकडून केऱ्हाळा व परिसरातील शेत शिवारात सुरु होती. दुसऱ्या दिवशी ही सकाळपर्यंत त्या घरी न परत आल्याने पुन्हा शेती शिवारात शोध मोहीम सकाळपासून दोन्ही महिल्यांच्या कुटुंबियांकडून व गावातील युवकांकडून सुरु होती. दुपारी एक वाजेच्या सुमारास खेडी शिवारात महिलांचा शोध घेणाऱ्या युवकांना नासिमाचा मृतदेह केऱ्हाळा बुद्रुक येथील नारायण रामचंद्र पाटील यांच्या तुरीच्या तर शालूबाईचा मृतदेह केऱ्हाळा खुर्द येथील विठ्ठल नारायण सोनवणे यांच्या तुरीच्या शेतात आढळून आले आहे. दोन्ही महिलांचे मृतदेह 20 ते 25 फुट अंतरावर आढळून आल्याने एकाच आक्रोश सुरु झाला. याप्रकारामुळे संपुर्ण जिल्हा हादरला आहे. दरम्यान काल रात्री उशीरापर्यंत दोन संशयितांना रावेर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.