जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्पर्धेच्या युगात ज्ञानाचा खजिना उपलब्ध असून स्वताला अपडेट ठेवले तर यश तुमच्या हातात राहील असे प्रतिपादन धांडे कोचिंगचे प्रा.धांडे यांनी आज केले. विवेकानंद क्लासेसच्या वार्षिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
पुढे बोलतांना त्यांनी नशिब हा शब्द नसून भक्कम तयारी फोकस ठेवून कार्य करणे तसेच नुसता विचार न करता प्रत्यक्षात कार्य करणे म्हणजे नशिब असे सांगतांना महाविद्यालयीन जिवनात प्रवेश करतांना जबाबदारीचे ओझेही सोबत येते. प्रगल्भतेकडे तुमची वाटचाल सूरू होते.
स्पर्धेच्या युगात स्वताला सिध्द करण्यासाठी ज्ञान अपडेट करणे गरजेचे आहे. यशाने हुरळून जाउ नका तर अपयशाने खचु नका. फिनिक्स पक्षाचे उदाहरण देतांना आकाशात झेप या पक्षाप्रमाणे भरारी घ्या असे सांगीतले. क्लासचे संचालक राकेश पाटील यांनी यशासाठी शुभेच्छा देत पालकांना परिक्षेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले.