Home आरोग्य आरोग्याचा सातबारा कोरा ठेवा—रजनीताई सावकारे 

आरोग्याचा सातबारा कोरा ठेवा—रजनीताई सावकारे 


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आयुष्य अनमोल असून त्याचे मोल जपण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. निरोगी शरीर, निरोगी मन आणि सकारात्मक विचार यांचा समतोल साधला तर दीर्घायुष्य सहज शक्य होते, असे प्रतिपादन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनीताई सावकारे यांनी केले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भुसावळ येथे आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणी शिबिरात त्या बोलत होत्या.

शहरातील ओम सिद्ध गुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांसाठी ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर, भुसावळ येथे हे नियमित आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास रजनीताई सावकारे यांच्यासह सौ. वैशाली पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आसिफ शेख, वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या संयोजक डॉ. नीतू पाटील, डॉ. तेजस सुराणा, डॉ. राहुल गवळी, संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सतीश जंगले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रजनीताई सावकारे यांनी वय वाढत असताना आहारात योग्य बदल करणे आणि पन्नाशीनंतर नियमित आरोग्य तपासणी करणे किती गरजेचे आहे, यावर भर दिला. अशा शिबिरांमुळे आजार लवकर ओळखता येतात आणि योग्य उपचार शक्य होतात. वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघासाठी ग्रामीण रुग्णालयाने राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी डॉ. आसिफ शेख यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, नियमित तपासणीचे महत्त्व आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ संघातील सुमारे ५१ ज्येष्ठ नागरिकांनी घेतला. तपासणीदरम्यान विविध विभागांतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. डॉ. तेजस कोटेचा, डॉ. विक्रांत सोनार, डॉ. राहुल गवळी, परिचारिका सौ. शोभा सोनावणे, सौ. प्रणिता पाथरवट, अधिपरिचारक आर. डी. बाविस्कर, औषध विभागातील मनोज डोंगरसिंग सावकारे, क्ष-किरण विभागातील अजीम शेख, रक्त तपासणी विभाग, ओपीडी नोंदणी विभागातील रुपेश शेळके व चेतन भालेराव यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व सहकारी वर्गाचे आभार मानण्यात आले. सूत्रसंचालन सतीश जंगले यांनी केले तर आभार प्रदर्शन धनराज पाटील यांनी केले. यावेळी डॉ. नीतू पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना,
“एक दिन जीत ऐसी आयेगी तुम्हारे हिस्से,
दुनिया भूल जायेगी अपने हार के हर किस्से…!”
हा शेर सादर करत उपस्थितांकडून भरभरून दाद मिळवली.


Protected Content

Play sound