निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षांची अन्नसाखळी जिवंत ठेवा – डॉ.सुनिल राजपूत यांचे आवाहन

चाळीसगाव (प्रतिनिधी) पक्ष्यांना दाणा-पाणी देण्याचे संस्कार नकळतपणे बालवयात आपणावर रुजवले जातात.पण आताच्या सिमेंटच्या जंगलांमध्ये पक्षांना अन्न पाणी मिळत नसल्यामुळे त्यांचे अतोनात हाल होतात.पक्षी निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका बजावत असतात यासाठी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षांची अन्नसाखळी जिवंत ठेवायला हवी.पाण्याच्या शोधात पक्षांना लांब भटकंती करावी लागते.उन्हाळ्यात पाण्याअभावी तहानेने व्याकूळ होऊन शेकडो पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागतात.प्रत्येकाने आपल्या घराच्या गच्चीवर,झाडावर,सावलीच्या ठिकाणी अशा प्रकारे भांडी भरुन ठेवल्यास हजारो पक्षांचा जीव वाचू शकतो ही भावना चाळीसगाववासियांमध्ये रुजविण्यासाठी पक्षांपर्यंत पाणी उपक्रमाने मोठा हातभार लागला आहे,महिला भगीनींनी राबविलेला उपक्रम स्तुत्य असून यात नागरिकांनी देखील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन कळंत्री विद्यालयाचे चेअरमन तथा जेष्ठ समाजसेवक डॉ.सुनिल राजपूत यांनी केले आहे.

 

शहरातील चंपाबाई रामरतन कळंत्री महाविद्यालयात आज सकाळी ९ वाजता उपक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी ते बोलत होते.युगंधरा फाउंडेशन व हिरकणी महिला मंडळाच्या वतीने शाळा,महाविद्यालयातून जनजागृती करण्यात आली असून शाळेतील आवारात मातीच्या भांड्यांची व्यवस्था करण्यात आली.यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ.सुनिल राजपूत,युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव,हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील,मुख्याध्यापक प्रमोद दायमा आदी मान्यवर उपस्थित होते. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळ्यास सुरुवात झाली असून उन्हाळ्यात तहानेमुळे घसा कोरडा पडत आहे.अशा या रणरणत्या उन्हात तहानेने व्याकुळ झालेल्या पक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आहे.कारण या दिवसांत पाणवठेही आटलेले असल्याने शहरांत पक्ष्यांना सहजासहजी पाणी उपलब्ध होत नाही.या प्रश्नाने व्यथित झालेल्या युगंधरा फाउंडेशन व हिरकणी महिला मंडळातर्फे जागतिक चिमणी दिवसापासून ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ या उपक्रमास सुरुवात करण्यात आली असून याची सांगता आज करण्यात आली अशी माहीती उपक्रमाचे समन्वयक स्वप्नील कोतकर यांनी दिली.

 

यावेळी सुचित्रा पाटील मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्यात की स्वतःपासून सुरुवात केली तर सर्व काही बदलू शकते.पर्यावरण रक्षणासाठी पहिले पाऊल उचलण्याची गरज असून माणूसकीचा मूलमंत्र लक्षात ठेवून संस्थेच्या वतीने पाणी पक्षांपर्यंत हा उपक्रम सुरु करण्याचा मानस हाती घेतला असून शहरातील अनेकविध भागात परळ ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तर मानवाच्या राहणीमानाच्या बदलत्या संकल्पनेमुळे पक्षांची देखील संख्या कमी होऊ लागली आहे.सलग दुसऱ्या वर्षी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जात असून ‘पक्षांपर्यंत पाणी’ हा अभिनव पद्धततीने उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमाची भावना हजारो लोकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनात जागविण्यात आल्याचे आम्हाला समाधान आहे.मागील वर्षी पक्षांच्या निवाऱ्यासाठी शाळा,महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयात घरटी वितरीत करण्यात आली होती याच औचित्यपर पक्षांपर्यंत पाणी या उपक्रमातून जागर करण्यात आला आहे.तहान अन भूकेने व्याकूळ झालेल्या पक्ष्यांनादेखील सर्व नागरीकांच्या सहकार्याची जोड हवी आहे तेव्हाच या उपक्रमाचे खरे सार्थक होईल अशी भावना स्मिता बच्छाव यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली आहे.

 

दिनांक २० मार्च ते २३ मार्च पर्यंत ‘पक्षांपर्यंत पाणी’ उपक्रम जागराने शहर ढवळून निघाले पक्षीमित्र भावना जागविण्यात या उपक्रमाने भरारी घेतली आहे मात्र ही भावना आपल्यासह समाजामध्ये कायम रहावी यासाठी शहरातील अनेकविध शाळांचे सहकार्य लाभले या उपक्रमाचे पालकांमध्ये विशेष कौतुक झाले विद्यार्थ्यांनी आपल्य घरात असलेली जूनी भांड्याची स्वतः परळ तयार करुन घराच्या परिसरात लावण्यासाठी हट्ट धरल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजली असल्याची अनेक पालकांनी संयोजकांकडे बोलून दाखवली.

Add Comment

Protected Content