जळगाव (प्रतिनिधी) संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी Multidisciplinary National conference on Management Engineering & Science या विषयानुसार के. सी.ई. सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात बुधवार १० एप्रिल रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषदेला के.सी.ई. सोसायटी ऑफिस कोषाध्यक्ष सुरेश चिरमाडे अध्यक्षतेखाली होणार आहे. तर परिषदेत पुणे येथील इंडीया साँफ्ट टेक्नोलॉजीचे एम. डी. सुनील चरे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. पी. राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी परिषदेचे संयोजक संजय सुगंधी, डॉ. प्रज्ञा विखार उपस्थित होते.